Big Boss Marathi Season 5 चा पहिला आठवडा! Big Boss सदस्यांना टास्क देते- आपल्यामधील ३ सदस्यांना निवडायला सांगते. त्यामध्ये इतर २ सदस्यांबद्दल खूप चर्चा होऊन देखील लवकर बहुमत होत नाही. मात्र तिसऱ्या सदस्याबद्दल तात्काळ सर्वांचे एकमत होते आणि त्याचे नाव ‘सुरज चव्हाण!’ त्याबद्दल सर्वांचे कारण एकच असते ते म्हणजे ‘सुरजला टास्क कळत नाही!’आणि १० आठवड्यानंतर सर्व सदस्य एकमुखाने रितेश देशमुख यांनी विचारल्यावर prediction करतात कि, विजेता असेल ‘सुरज चव्हाण!’ आणि खरच आज Big Boss Marathi Season 5 ची tropy उचलली ती ‘गुलीगत’, ‘बुक्कीत टेंगुळ’ यासारख्या शब्दांनी महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या सुरज चव्हाण याने!
Big Boss Marathi Season 5 चा शानदार असा grand fenale आज पार पडला. यामध्ये top 6 सदस्यांमध्ये evict होत-होत अभिजित सावंत आणि सुरज चव्हाण हे शेवटी दोघे घराचे light बंद करून winning moment साठी घराबाहेर आले. यावेळी सुरज चव्हाण हा खूपच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
सुरुवातीलाच जानवी किल्लेदार हिने ९ लाख रु ची ब्रीफकेस घेऊन walkout केले. त्यापाठोपाठ अंकिता प्रभू वालावलकर आणि धनंजय पवार DP हे सुद्धा Evict झाले. निक्की तांबोळी, अभिजित सावंत आणि सुरज चव्हाण हे top 3 finalist शेवटी उरले. त्यामध्ये निक्की evict झाली आणि अभिजित आणि सुरज मध्ये tropy साठी खेळ सुरु झाला.
या संपूर्ण सिझन मध्ये सुरज ने आपल्या वेगळ्या, हटके मात्र मातीतल्या style ने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चाहतावर्ग तयार केला.अतिशय गरीबीतून पुढे आलेला, नम्र आणि सुस्वभावी सुरजने घरात तसेच बाहेर देखील आपल्या खेळातून जनतेच्या मनात घर केलं. ‘गुलीगत’, ‘बुक्कीत टेंगुळ’ यांसारख्या शब्दांनी संपूर्ण जनतेला वेड केल. त्याच्या झापुक-झुपुक dance style ने तर सर्वत्र धुमाकूळ घातला. अगदी colors marathi वाहिनीचे हेड केदार शिंदे यांनी स्टेजवरूनच ‘झापुक-झुपुक’ नावाच्या सिनेमाची घोषणा केली आणि त्यामध्ये अभिनेता म्हणून घोषित केले सुरज चव्हाण याला!!
अभिजित आणि सुरज मध्ये खर तर दोघेही तितकेच tropy चे दावेदार होते. त्यामुळे नेमके कोण विजेता होईल याबाबत सम्रम होता. शेवटी निवेदक रितेश देशमुख यांनी “आणि Big Boss Marathi Season 5 चा winner आहे सुरज चव्हाण!’ अशी घोषणा केली आणि अख्खा महाराष्ट ‘झापुक – झुपुक’ करू लागला!!
-‘Team माहितीदूत Mahitidoot!!’