देशाचे महान उद्योगपती आणि आपल्या मानवतावादी दृस्तीकोनाने जगभरात आदराचे स्थान निर्माण करणारे पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण रतन टाटा यांची अखेर वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात प्राणज्योत मालवली.
देशाच्या उद्योग क्षेत्राचे जनक जे.आर.डी. टाटा यांचे कुटुंबात दत्तक गेलेले रतन टाटा यांचा जन्म मुंबई येथे २८ डिसेंबर, १९३७ रोजी पारशी कुटुंबात झाला. मुंबई, शिमला येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी न्यूयार्क येथे तसेच कॉर्नेल विद्यापीठ येथे आर्किटेक्चर मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तसेच हार्वर्ड बिसनेस स्कूलमध्येही व्यवस्थापनाची पदवी पूर्ण केली.
त्यानंतर ते १९६१ पासून टाटा उद्योगात काम करू लागले. अगदी सुरुवातीला टाटा सन्समध्ये ground level चे काम करू लागले. विवध कामकाजाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांना १९७१ मध्ये Tata Group मधील NELCO या तोट्यात असणाऱ्या कंपनीची जबाबदारी देण्यात आली.मात्र त्यांनी मोठ्या जिद्दीने ही कंपनी नफ्यात आणली. तथापि, आणीबाणीमुळे हि कंपनी बंद पडली. पुढे त्यांना परत अश्याच बंद पडत चाललेल्या Empress Mill ची जबाबदारी देण्यात आली. तिथेही त्यांनी अथक परिश्रम करून कंपनी चालवायचा प्रयत्न केला. मात्र हि कंपनी देखील बंद झाली. या प्रवासातून टाटांना खूप शिकायला मिळाले. यानंतर मात्र त्यांनी मिळेल ती जबाबदारी स्वीकारत Tata Group मध्ये स्वतःला झोकून दिले. यामुळे जे.आर.डी. टाटा त्यांचेवर खुश झाले. पुढे १९९१ मध्ये जे.आर.डी. यांनी Tata Group ची सर्व सूत्रे रतन टाटा यांचेकडे सोपवली आणि ते निवृत्त झाले. रतन टाटा यांनी या देशी brand पुढे नेत असतानाच Tetley Tea, Corus Steel Group,Jaguar आणि Land Rover यांसारखे जागतिक brand खरेदी करून या Group ला जागतिक पातळीवर नेले. समुहाचा जगभर विस्तार केला, नावलौकिक मिळवला.
Tata Group मधील प्रथेनुसार त्यांनी आपल्या वयाच्या ७५ व्या वाढदिवशी या उद्योगसमुहातून निवृत्ती घेतली व सर्व सूत्रे सायरस मिस्त्री यांचेकडे सोपवली. मात्र त्यांना २०१६ मध्ये उद्योग समुहातून दूर केले. आणि स्वतः अंतरिम प्रमुख म्हणून काही काळ काम केले. पुढे पुन्हा त्यांनी या समुहाची सूत्रे नटराजन यांचेकडे सोपवून निवृत्ती जाहीर केली.
फक्त नफा कमवणारा उद्योगसमूह असा उद्देश Tata Group चा कधीच नव्हता. देशाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणार्या या समूहाला रतन टाटांनी अधिकच देशप्रेमी बनवले. नैतिकता, मुल्ये यांची आयुष्यभर जपवणूक केली. सर्वसामान्यांना परवडेल अशा १ लाखाच्या बजेटमधील ‘Nano Car’ चा प्रकल्प हा त्यातलाच एक भाग! Tigor ही पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक कार बनवण्याचे स्वप्नही त्यांचेच! उद्योगामध्ये नफ्याऐवजी ‘मूल्य’ जपणारे टाटा याबाबत आयुष्यभर दक्ष राहिले. कमाई मधील ६०-७०% हिस्सा ते charity करत. यासाठी त्यांनी Charitable Trust ची स्थापना केली होती. दानशूरपणासाठी ते जगप्रसिद्ध होते.
आयुष्यभर अविवाहित राहणाऱ्या रतन टाटा यांना देश-विदेशातील विविध मानसन्मान मिळाले. पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, आसाम बैभव इ. सारखे सर्वोच्च सन्मान देखील मिळाले.
अशा या परोपकारी, नैतिकता जपणाऱ्या, महान उद्योगपतीला ‘Team माहितीदूत Mahitidoot’ तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!